The Research Wing of Chinmaya Mission - Blog #Prakarana Grantha
रमण महर्षींचे 'उपदेश सार'  हे फक्त ३० श्लोकांचे छोटेखानी पण अतिशय अर्थगर्भपुस्तक आहे. संपूर्ण अध्यात्म, वेदान्त आणि आत्मज्ञान, ह्यांचा अर्क या छोट्याशा ग्रंथात आहे.
अनेकदा आपल्याला वाटते की मोक्ष मिळवणे, ईश्वराला जाणणे किंवा मनाला शांत करणे ह्या सर्व गोष्टी खूप कठीण आहेत. पण रमण महर्षी सांगतात की, ह्या सर्वांसाठी स्वतःचा शोध घेणे हाच सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. हा ग्रंथ म्हणजे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाची दिशादर्शक वाटचाल आहे.
यात रमण महर्षींनी प्रगतीचे ४ टप्पे अतिशय सोप्या रीतीने सांगितले आहेत:
१. कर्म मार्ग
सुरुवातीला माणूस फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतो. पण केवळ कर्माने मोक्ष मिळत नाही, कारण कर्माचे फळ नष्ट होणारे असते. पण, जेव्हा आपण आपली कर्तव्ये 'ईश्वरार्पण बुद्धीने' (ईश्वराला समर्पित करून) आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता करतो, तेव्हा आपले मन शुद्ध होते. आणि असे शुद्ध मन आत्मज्ञानासाठी तयार असते.
२. भक्ती आणि उपासना
मन शुद्ध झाल्यावर परमेश्वराचे नाव घेणे, पूजा करणे किंवा मनातल्या मनात त्याचे ध्यान करणे यामुळे मन एकाग्र होते. मूर्तीपूजेपेक्षा त्याचे चिंतन करणे श्रेष्ठ आहे आणि त्याहूनही श्रेष्ठ म्हणजे 'मी आणि परमेश्वर एकच आहोत' हा भाव मनात ठेवणे. यामुळे मनाची चंचलता थांबते.
३. योग आणि प्राणायाम
ज्यांचे मन खूप इकडेतिकडे धावते, त्यांच्यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे: प्राणायाम.
जसा एखादा पक्षी जाळ्यात अडकतो, तसेच प्राणायामाने मन नियंत्रणात येते. कारण श्वास आणि मन हे एकाच शक्तीच्या दोन शाखा आहेत. श्वास शांत झाला की मन आपोआप शांत होते.
४. ज्ञान मार्ग -  'मी कोण?'
हा या ग्रंथाचा महत्त्वपूर्ण गाभा. महर्षी म्हणतात: मन म्हणजे काय? मन म्हणजे दुसरं काही नसून केवळ सर्व विचार होत. आणि या सगळ्या विचारांच्या मुळाशी एकच मुख्य विचार असतो, तो म्हणजे 'मी'.
जेव्हा आपण बाहेरच्या जगाचा विचार सोडून मनालाच  विचारतो की, "हा 'मी' कुठून निर्माण होतोय? मी कोण आहे?", तेव्हा तो अहंकार हळूहळू नाहीसा होतो. जसा दिवा विझल्यावर प्रकाश मूळ स्रोतात विलीन होतो, तसेच मन आपल्या मूळ स्वरूपात (आत्म्यात) स्थिर होते. तिथे फक्त निखळ आनंद आणि शांतता उरते.
उपदेश सार का अभ्यासावे?
वेळा: जाडजूड ग्रंथांचा अभ्यास करायला वेळ नसेल, तर हे ३० श्लोक कमी वेळात वेदान्ताचे परम सत्य समजून घ्यायला मदत करेल.
थेट आणि सोपी पद्धत: गुंतागुंतीची पद्धत नाही. अंधश्रद्धा किंवा कठीण कर्मकांडांऐवजी थेट स्वतःच्या मनावर काम करा.
मार्गदर्शन: जर ध्यान  करताना अडचणी येत असतील, वा मन शांत होत नसेल, तर हे पुस्तक तुम्हाला अचूक दिशा दाखवेल.
हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर रोजच्या आयुष्यात अनुभवण्यासाठी आहे. याचे छोटे छोटे श्लोक आणि त्याचा अर्थ जेव्हा तुम्ही अभ्यासाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की ज्या शांततेचा शोध तुम्ही बाहेर घेत आहात, ती तुमच्या आतच आहे.
ह्या अभ्यासासाठी साहाय्यः 'उपदेश सार' चा शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी Chinmaya International Foundation (CIF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यामधील विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि अर्थातच तिथल्या पुस्तकाच्या दुकानात पुस्तकही उपलब्ध आहेच.
- Uma Patki